धोनी समालोचन करणार नाही

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-11-07 05:20:00

img

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारत व बांगलादेश यांच्यात कोलकाता येथे होणाऱया दुसऱया व शेवटच्या कसोटी सामन्यात महेंद्रसिंग धोनी समालोचन करण्याची अजिबात शक्यता नाही, असे त्याच्या एका निकटवर्तियाने नमूद केले. या मालिकेचे थेट प्रसारण करणाऱया स्टार स्पोर्टस वाहिनीने धोनीला समालोचनात पदार्पणाची संधी द्यावी, अशा आशयाचा प्रस्ताव बीसीसीआयला दिला होता. पण, मंडळाने याबाबत अद्याप उत्तर दिलेले नाही. भारत-बांगलादेश यांच्यातील ही कसोटी दिवस-रात्र खेळवली जाणार असून त्यात गुलाबी चेंडू वापरला जाईल.

भारतीय संघ इंग्लंडमध्ये जुलै महिन्यात संपन्न झालेल्या आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत गारद झाला आणि त्यानंतर धोनीने भारतातर्फे अद्याप एकही सामना खेळलेला नाही. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील भविष्याविषयी आतापर्यंत बरीच चर्चा झडली. पण, स्वतः धोनीने याबाबत अवाक्षरही काढलेले नाही. निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी छोटेखानी क्रिकेट प्रकारात ऋषभ पंतला संघाचे प्राधान्य राहील, अशी घोषणा यापूर्वीच केली असल्याने हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD