नव्या विक्रमासाठी कोहली सज्ज

Indian News

Indian News

Author 2019-10-10 09:50:36

img

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणखी एका विक्रमाला गवसणी घालण्यास सज्ज आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर, द वॉल राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या कामगिरीला मागे टाकण्यासाठी विक्षा अधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांचा समावेश आहे. विराटला या यादीत येण्यासाठी अवघ्या 242 धावांची आवश्‍यकता आहे. सध्याचा विराटचा फॉर्म पाहता तो या मालिकेतच हा विक्रम मोडण्याची अपेक्षा आहे.

विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले असून 16 डावांत 47.37 च्या सरासरीने 758 धावा केल्या आहेत. त्याशिवाय दोन शतके आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत.

आता कसोटी मालिकेत 242 धावा केल्यानंतर विराटच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक हजार कसोटी धावा पूर्ण होतील.

अशी कामगिरी करणारा विराट चौथा भारतीय फलंदाज ठरणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या अव्वल स्थानी आहे. सचिनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 25 कसोटी सामने खेळले. यामध्ये त्याने 45 डावात 1741 धावा केल्या आहेत.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD