नागपूरमध्ये कोण बाजी मारणार?; आज अखेरची लढत!

Indian News

Indian News

Author 2019-11-10 11:34:10

img

रांची | दिल्ली येथील पहिल्याच सामन्यात बांगलादेशने धक्कादायक आणि अनपेक्षित असा विजय मिळवल्यानंतर भारतानेही राजकोटमध्ये जोरदार मुसंडी मारली. तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. त्यामुळे नागपूरच्या सामन्याला आज 'फायनल' चे स्वरूप आलं आहे.

आजच्या सामन्यात बाजी मारून भारतीय संघ आपली सत्ता कायम ठेवणार?, की बांगलादेश संघ भारताविरूद्ध पहिल्यांदाच मालिका विजय साकार करतो?, याचा निकाल आजच्या जामठा स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात कळंल.

पुढील वर्षीच्या ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी पर्याय चाचपडण्यासाठी कर्णधार विराट कोहलीसह काही महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

रोहितने दोन्ही सामन्यांत एकच संघ खेळवल्याने मनीष पांडे, संजू सॅमसन व राहुल चहर अद्याप संधीच्या प्रतीक्षेत आहेत.

राजकोटला रोहित शर्माची 85 धावांची वादळी खेळी चाहत्यांनी अनुभवली. त्याच्यावर कसे नियंत्रण मिळवावे, यासाठी बांगलादेशचा संघ रणनीती आखत आहे. राहुल आणि अष्टपैलू शिवम दुबे प्रभाव पाडू शकलेले नाहीत. 2 जामठाच्या मैदानावर भारताने तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत.

आज दुसरा टी-20 सामना; भारतासमोर दुहेरी आव्हान!

आता IPL मधील पंच आणि कर्णधारांमधील राडेबाजी होणार बंद;…

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN