पंजाबची विदर्भावर 7 गडय़ांनी मात

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-06 04:43:00

img

वृत्तसंस्था/ वडोदरा

येथे सुरु असलेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेत शनिवारी खेळवल्या गेलेल्या सामन्यात पंजाबने विदर्भावर 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह पंजाबला चार गुण मिळाले आहेत. प्रारंभी, प्रथम फलंदाजी करताना विदर्भाचा डाव 43.1 षटकांत 155 धावांवर संपुष्टात आला. फैज फैजलने सर्वाधिक 72 धावा फटकावल्या. जितेश शर्माने 16 तर ऋषभ राठोडने 26 धावा फटकावल्या. इतर फलंदाजांनी निराशा केल्याने विदर्भाचा डाव कोलमडला. पंजाबकडून करन कालियाने सर्वाधिक 32 धावांत 4 गडी बाद केले. यानंतर, विजयासाठीचे लक्ष्य पंजाबने 46.2 षटकांत 3 गडय़ांच्या मोबदल्यात पूर्ण केले. गुरकीरत सिंगने नाबाद अर्धशतकी खेळी साकारत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याला अनमोलप्रीत सिंगने नाबाद 42 व अभिषेक शर्माने 33 धावा करत चांगली साथ दिली.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN