पंतला पाठिंबा द्या - गिलख्रिस्ट

Indian News

Indian News

Author 2019-11-06 11:15:06

img

मुंबई: नवोदित यष्टीरक्षक ऋषभ पंतकडून जबाबदार खेळाची अपेक्षा होती. मात्र, त्यात त्याला वारंवार अपयश जरी येत असले तरी त्याच्याकडे गुणवत्ता आहे, त्यामुळे त्याला वेळ आणि पाठिंबा द्यायला हवा, केवळ चुकांबाबत त्याला लक्ष्य केले जाऊ नये, असे आवाहन ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू व यष्टीरक्षक ऍडम गिलख्रिस्ट याने केले आहे.

टूरिजम वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला असताना गिलख्रिस्टने आपले मनोगत व्यक्‍त केले. भरपूर संधी मिळूनही पंतकडून चुका होत आहेत. त्यामुळे त्याच्यावर सातत्याने टीका होत आहे. महेंद्रसिंग धोनीची जागा घेण्याचा विचार न करता आपले स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न पंतने केला पाहिजे, असेही गिलख्रिस्टने व्यक्त केले आहे.

पंतला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. तर त्याच्या जागी संधी दिलेल्या वृद्धीमान साहाने उत्कृष्ट खेळ केला. पंतला बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यातही खास कामगिरी करता आली नाही. त्याचा डीआरएसचा निर्णय चुकल्यामुळे त्याच्यावर मोठी टीका झाली, गिलख्रिस्टने मात्र पंतला अजून वेळ द्या तो निश्‍चितच कसोटीला उतरेल असे सांगितले.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD