पंत गुणी खेळाडू, त्याला सेट व्हायला थोडा वेळ द्या!

Indian News

Indian News

Author 2019-11-10 07:50:00

img

युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत अजून सीनियर संघात नवखा आहे . या गुणी खेळाडूला संघात सेट व्हायला थोडा वेळ द्या, तो नक्कीच चमकदार खेळ करू शकेल असा विश्वास व्यक्त करीत बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी सध्या अपयशाच्या गर्तेत सापडलेल्या पंतची पाठराखण केली आहे. रिषभ खरेच एक प्रतिभाशाली क्रिकेटर आहे. त्याची प्रचीती त्याने युवा संघातील आपल्या शानदार कामगिरीने अगोदरच दिली आहे . सीनियर संघात बस्तान बसविण्यासाठी त्याला थोडा वेळ लागेल . तो आपण द्यायलाच हवा , असे गांगुली म्हणाले .

उद्या नागपूरमध्ये हिंदुस्थान - बांगलादेश संघातील अखेरची आणि तिसरी टी -20 लढत खेळवली जाणार आहे . या लढतीत पंत आपल्या आधीच्या चुका सुधारून टीम इंडियासाठी यष्टिरक्षण आणि फलंदाजीत उत्तम कामगिरी साकारेल असा विश्वासही गांगुली यांनी व्यक्त केला . राजकोटच्या दुसऱ्या टी -20 लढतीत यष्टय़ांच्या पुढे येत चेंडू पकडून फलंदाजाला यष्टिचित करण्याची चूक केली होती . या नियमबाह्य कृतीमुळे पंचांनी फलंदाजाला नाबाद ठरवले होते . या लढतीत पंत फलंदाजीतही फ्लॉप ठरल्याने त्याच्यावर टीकेचा भडिमार होत असताना गांगुली त्याच्या मदतीला धावले आहेत .

रिषभ खरेच जिगरबाज आणि हुन्नरी खेळाडू आहे . त्याला परिपक्व व्हायला थोडा वेळ आपण द्यायलाच हवाय . अनुभव वाढला की तो खरेच संघासाठी उत्तम कामगिरी साकारेल असा मला विश्वास आहे .

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN