पाकविरूद्ध सामन्यातून मॅडिन्सनची माघार

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-11-10 04:42:00

img

वृत्तसंस्था/ पर्थ

सध्या पाकचा क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर असून येथे येत्या सोमवारपासून खेळविल्या जाणाऱया तीन दिवसांच्या दिव-रात्रीच्या सरावाच्या सामन्यातून ऑस्ट्रेलिया अ संघातील फलंदाज निक मॅडिन्सनने मानसिक तंदुरूस्तीच्या समस्येवरून माघार घेतल्याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिली आहे.

आठवडय़ापूर्वी ऑस्ट्रेलिया अष्टपैलू मॅक्सवेलने लंकेविरूद्धच्या टी-20 मालिकेतून मानसिक तंदुरूस्तीच्या समस्येवरून माघार घेतली होती. याच कारणास्तव सामन्यातून माघार घेणाऱया मॅडिन्सन हा ऑस्ट्रेलियाचा दुसरा क्रिकेटपटू आहे. 2016 साली मॅडिन्सनने तीन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यानंतर त्याला मानसिक तंदुरूस्तीच्या समस्येला तोंड द्यावे लागल्याने त्याला कसोटी संघातून वगळण्यात आले होते. आता या आगामी सराव सामन्यात मॅडिन्सनच्या जागी सलामीचा फलंदाज बँक्रॉफ्टचा ऑस्ट्रेलिया अ संघात समावेश करण्यात आला आहे. पाक आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली क्रिकेट कसोटी 21 नोव्हेंबरपासून ब्रिस्बेन येथे सुरू होईल. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने पाकविरूद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 असा विजय मिळविला आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN