पाकिस्तानचा भारताला अल्टिमेटम, दिली जूनपर्यंतची मुदत!

Indian News

Indian News

Author 2019-09-30 10:35:00

img

कराची, 30 सप्टेंबर: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील संबंधांमध्ये सध्या प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानने भारता सोबतचा व्यापर बंद केला आहे. भारताला हवाई क्षेत्र देखील वापरण्यास नकार दिला आहे. अशातच पुढील वर्षी होणाऱ्या आशियाई क्रिकेट स्पर्धे (Asia Cup)संदर्भात पाकिस्तान क्रिकेट बोर्डा(pakistan Cricket Board)ने भारतीय क्रिकेट नियामक मंडळा(BCCI) ला अल्टिमेटम दिला आहे. या स्पर्धेत भारत सहभागी होणार आहे की नाही हे जून 2020पर्यंत सांगावे असे पाक बोर्डाने म्हटले आहे.

आशिया कपसाठी भारत पाकिस्तानमध्ये येण्यास तयार होईल की नाही याबाबत ठोसपणे सांगता येणार नाही. ही स्पर्धा पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यात होणार आहे.

त्यासाठी अद्याप बराच वेळ शिल्लक आहे. पण जूनपर्यंत आम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की स्पर्धा कुठे होणार आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळणार नाही म्हणून त्याचे आयोजन येथे होणार नाही याबद्दल शंका असल्याचे मत पाक बोर्डाचे सीईओ वसीम खान(Wasim Khan) यांनी व्यक्त केले. स्पर्धेचे ठिकाण बदलण्याचा अंतिम अधिकार आशियाई क्रिकेट परिषदे(Asian Cricket Council)ला आहे. स्पर्धा कुठे होणार याचा निर्णय परिषत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला घ्यायचा आहे. आम्ही या स्पर्धेचे आयोजन करण्यास उत्सुक आहोत, असेही खान म्हणाले.

दहशतवादाच्या मुद्यावरून दोन्ही देशांमधील द्विपक्षीय क्रिकेट बंद आहे. हे दोन्ही देश केवळ आयसीसीच्या स्पर्धेत क्रिकेट खेळतात. बोर्ड पातळीवर आमचे आणि बीसीसीआयचे संबंध चांगले आहेत. पण क्रिकेट खेळण्यासंदर्भातील अंतिम निर्णय तेथील सरकारचा आहे. द्विपक्षीय मालिकेसाठी आम्ही त्यांच्या मागे लागू शकत नाही. जर भारताला क्रिकेट खेळायचे असेल तर तसे त्यांनी सांगितले पाहिजे. पाकिस्तान तटस्थ ठिकाणी भारतासोबत खेळण्यास तयार असल्याचे खान यांनी स्पष्ट केले.

साताऱ्यातील उमेदवारीबाबत पृथ्वीराज चव्हाण घेणार दोन दिवसांत निर्णय?

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD