पाकिस्तानचा वनडे मालिका विजय, मालिका 2-1 फरकाने खिशात

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-04 03:17:00

img

वृत्तसंस्था /लाहोर :

फखर झामन (76), आबिद अली (74), हॅरिस सोहेल (56) यांच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने तिसऱया व व शेवटच्या वनडे सामन्यात श्रीलंकेवर 5 गडी राखून विजय मिळवला. प्रारंभी, लंकेने निर्धारित 50 षटकांत 9 बाद 297 धावा केल्या. यानंतर, पाकने विजयी लक्ष्य 5 गडय़ांच्या मोबदल्यात पूर्ण करत विजयाला गवसणी घातली. या विजयासह पाकने तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली. पाकच्या आबिद अलीला सामनावीर तर बाबर आझमला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. आता, शनिवारपासून उभय संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे.

प्रारंभी, लंकन संघाने सलामीवीर दानुष्का गुणथिलकेच्या शतकी खेळीच्या जोरावर 50 षटकांत 9 बाद 297 धावा केल्या. गुणथिलकेने 134 चेंडूत 16 चौकार व 1 षटकारासह 133 धावांची शानदार खेळी साकारली. कर्णधार थिरिमने (36), मिनोद भानुका (35.) व शनाका (43) यांनी चांगली साथ दिली. इतर फलंदाजांनी मात्र निराशा केल्यामुळे लंकन संघाला साडेतीनशेचा टप्पा गाठता आला नाही.

प्रत्युतरात खेळताना पाकने विजयी लक्ष्य 48.2 षटकांत 5 गडय़ांच्या मोबदल्यात पार केले. सलामीवीर फखर झामन (91 चेंडूत 76) व आबिद अली (67 चेंडूत 74) यांनी शतकी भागीदारी साकारत संघाच्या विजयाचा पाया रचला. ही जोडी बाद झाल्यानंतर हॅरिस सोहेल (50 चेंडूत 56), बाबर आझम (26 चेंडूत 31) व कर्णधार सर्फराज अहमद (23) यांनी शानदार खेळी साकारत संघाला विजय मिळवून दिला. पाक फलंदाजांनी लंकन गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना चौफेर फटकेबाजी केली.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD