पाक टी-20 संघात उमर अकमल, अहमद शेहजादचा समावेश

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-03 04:56:00

img

वृत्तसंस्था/ लाहोर

श्रीलंकेविरुद्ध होणाऱया तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी बुधवारी 16 सदस्यीय पाकिस्तान संघाची घोषणा करण्यात आली. स्टार खेळाडू उमर अकमल व अहमद शेहजाद यांचे तब्बल दीड वर्षानंतर पाक संघात पुनरागमन झाले आहे. सर्फराज अहमदकडे कर्णधारपदाची धुरा कायम ठेवण्यात आल्याचे निवड समितीने यावेळी स्पष्ट केले.

2008 मधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रथमच श्रीलंकन संघ पाकिस्तान दौऱयावर आला आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत उभय संघात तीन सामन्यांची वनडे मालिका संपल्यानंतर शनिवार (दि.5) पासून तीन टी-20 सामन्यांची मालिका लाहोर येथे खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी सर्फराज अहमदकडे नेतृत्व कायम ठेवण्यात आले असून बाबर आझमची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच स्थानिक क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणाऱया इफ्तिकार अहमद व मोहम्मद नवाजला संघात स्थान देण्यात आले आहे. वनडे मालिकेनंतर टी-20 मालिकेत पाक संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्वाचे ठरणर आहे.

पाकिस्तान टी-20 संघ- सर्फराज अहमद (कर्णधार), बाबर आझम, अहमद शेहजाद, असीफ अली, फहीम अश्रफ, फखर झामन, हॅरिस सोहेल, इफ्तिकार अहमद, इमाद वासीम, मोहम्मद अमीर, मोहम्मद हॅन्सेन, मोहम्मद नवाज, शादाब खान, उमर अकमल, उस्मान शेनवारी व वहाब रियाज.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN