पीटी उषाला व्हेटरन पिन पुरस्कार

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-09-26 04:31:00

img

दोहातील आयएएएफ परिषदेवेळी पुरस्कार वितरण

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताची माजी धावपटू व ऑलिम्पियन पीटी उषाला आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स फेडरेशन संघटनेतर्फे व्हेटरन पिन ऍवॉर्ड या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दोहामध्ये झालेल्या 52 व्या आयएएएफ परिषदेवेळी तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘दोहातील आयएएएएफ परिषदेवेळी व्हेटरन पिन पुरस्कार देऊन मला सन्मानित केले याबद्दल मी कृतज्ञ आहे. या पुरस्काराने देशातील ऍथलेटिक्सच्या वाढीसाठी आणखी काम करण्याची प्रेरणा मिळाली असून यापुढेही मी योगदान देत राहीन,’ अशा भावना उषाने ट्विटच्या माध्यमांतून  व्यक्त केल्या आहेत. या ट्विटेसोबत तिने पुरस्कार प्रदान करीत असतानाची छायाचित्रेही पोस्ट केली आहेत. आयएएएफ अध्यक्ष सेबॅस्टियन को यांनी तिला हा पुरस्कार प्रदान केला.

1984 च्या लॉस एंजेलीस ऑलिम्पिकमध्ये पीटी उषाने चमकदार प्रदर्शन केले होते. 400 मी. हर्डल्समध्ये तिचे कांस्यपदक केवळ 0.01 सेकंदाने हुकले होते. भारताची धावराणी व पय्योली एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱया पीटी उषाला 1983 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हाते. त्यानंतर 1985 मध्ये तिला पद्मश्री किताब बहाल करण्यात आला होता.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN