पीवायसीचे क्‍लब ऑफ महाराष्ट्रवर वर्चस्व

Indian News

Indian News

Author 2019-11-03 10:30:09

img

पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे दुसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत पहिल्या सामन्यात साहिल चुरी (13-3), आदित्य दावरे (34-3), सिद्धेश वीर (28-2) यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाला 94 धावांवर रोखले. तर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने आज दिवसअखेर 43 धावा केल्या.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाचा डाव 30.4 षटकांत 94 धावावर संपुष्टात आला. यात सलामीचे फलंदाज शिवकुमार चुग 36 धावा, राजवर्धन उंडरे 20धावा करून बाद झाल्यानंतर एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या उभारू शकला नाही.

पीवायसी संघाच्या साहिल चुरीने 13 धावांत 3 गडी व आदित्य दावरेने 34 धावांत 3 गडी बाद करून क्‍लब ऑफ महाराष्ट्रचा निम्मा संघ तंबूत परत पाठवला. याच्या उत्तरात पीवायसी हिंदू जिमखाना संघाने आज दिवसअखेर 21 षटकांत 1 बाद 43 धावा केल्या. यात सिद्धेश वीर 10 धावा काढून धावबाद झाला. तर श्रेयश वालेकर नाबाद 26 धावा, यश माने नाबाद 3 धावांवर खेळत आहे. क्‍लब ऑफ महाराष्ट्र व पीवायसी हिंदू जिमखाना यांच्यातील सामन्याचा अजून एक दिवसाचा खेळ बाकी आहे. पहिल्या डावात पीवायसी संघ अजून 51 धावांनी पिछाडीवर आहे.

याआधी स्पर्धेचे उद्‌घाटन पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ. सुधीर भाटे, क्‍लबचे मानद सचिव आनंद परांजपे, क्‍लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, स्व. राजू भालेकर यांच्या पत्नी श्रीमती भालेकर, गोल्डफिल्ड प्रॉपर्टीजचे अनिल छाजेड आणि टी. एन. सुंदर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सारंग लागू, रणजित पांडे, महेंद्र गोखले आणि कपिल खरे उपस्थित होते.

सविस्तर निकाल-
साखळी फेरी - पहिला डाव : क्‍लब ऑफ महाराष्ट्र : 30.4 षटकात सर्वबाद 94 धावा (शिवकुमार चुग 36, राजवर्धन उंडरे 20, स्वप्निल पाठडे 9, विराज दारवटकर 5, साहिल चुरी 13-3, आदित्य दावरे 34-3, सिद्धेश वीर 28-2, आर्या जाधव 8-1) वि. पीवायसी हिंदू जिमखाना : 21 षटकांत 1 बाद 43 धावा (सिद्धेश वीर 10, श्रेयश वालेकर नाबाद 26, यश माने नाबाद 3).

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD