पीवायसी संघाचा रोमहर्षक विजय

Indian News

Indian News

Author 2019-10-04 10:00:03

img

पुणे: साईराज चोरगे (नाबाद 24 धावा व 3 बळी) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने पनवेल स्पोर्टस अकादमी संघाचा 9 गडी राखून पराभव केला आणि पीएमपी ग्रुप पुणे व स्टार क्रिकेट अकादमी आयोजित पीएमपी करंडक क्रिकेट स्पर्धेत शानदार सुरुवात केली.

पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील साखळी सामन्यात पीवायसी संघाच्या उत्कृष्ट गोलंदाजीपुढे पनवेल अकादमी संघाचा डाव 33.2 षटकांत सर्वबाद 99 धावांत कोसळला. पीवायसी संघाकडून साईराज चोरगेने 7 धावांत 3 गडी बाद केले. साईराजला आयुष्य चव्हाण, अर्जुन कुलकर्णी यांनी प्रत्येकी दोन गडी तर अर्चित गायकवाडने एक गडी बाद करून सुरेख साथ दिली.

हे आव्हान पीवायसीने 19 षटकांत 1 बाद 102 धावा करून पूर्ण केले. सलामीचा फलंदाज आर्य पानसेने 2 चौकारांसह 56 चेंडूत 31 धावा करून संघाला सुरेख सुरुवात करून दिली. आर्य पानसे (31 धावा) व सुफियान सय्यद (नाबाद 23 धावा) यांनी पहिल्या गड्यासाठी 72 चेंडूत 51 धावांची भागीदारी केली. सय्यद व साईराज चोरगे यांनी दुसऱ्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी करून संघाचा विजय सुकर केला. अष्टपैलू कामगिरी करणारा साईराज चोरगे सामन्याचा मानकरी ठरला.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD