पीवायसी संघाची विजयी सलामी

Indian News

Indian News

Author 2019-11-05 11:00:23

img

पुणे: राजू भालेकर करंडक निमंत्रित 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत पहिल्या सामन्यात पीवायसी हिंदू जिमखाना संघाने क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाचा 6 गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली.

या स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाचा आज 21 षटकांपासून खेळ पुढे सुरू झाला. तत्पूर्वी काल क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाचा डाव 30.4 षटकांत 94 धावांवर संपुष्टात आला.

पहिल्या डावात पीवायसी संघाने 58 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघ 33 षटकांत 104 धावांवर संपुष्टात आला.

पीवायसीकडून आदित्य दावरेने 4 गडी बाद केले. 58 धावांनी आघाडीवर असलेल्या पीवायसी संघाने हे आव्हान 13 षटकांत 4 बाद 49 धावा करून पूर्ण केले.

सामन्याचा मानकरी आदित्य
दावरे ठरला.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN