पीसीएच्या पुरस्कारासाठी स्टोक्सची निवड

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-04 03:03:00

img

लंडन : इंग्लंडच्या व्यावसायिक क्रिकेटपटू संघटनेच्या (पीसीए) 2019 सालातील सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठी अष्टपैलू बेन स्टोक्सची निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडला जेतेपद मिळून देण्यात स्टोक्सचे योगदान महत्वाचे ठरले होते. इंग्लंडच्या व्यवसायिक क्रिकेटपटू संघटनेतर्फे वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटूंसाठी निवड करण्यासाठी झालेल्या मतदानामध्ये स्टोक्सला अधिक मते मिळाली. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरूद्ध स्टोक्सची खेळी निर्णायक ठरली होती. तसेच ऍशेस मालिकेतील तिसऱया कसोटीत 28 वर्षीय स्टोक्सने नाबाद 135 धावांची खेळी करून इंग्लंडला विजय मिळवून दिला होता. इंग्लंडच्या व्यावसायिक क्रिकेटपटू संघटनेतर्फे बुधवारी स्टोक्सचा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. या संघटनेतर्फे इंग्लंडच्या ख्रिस वोक्सची वर्षातील सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटू म्हणून निवड करून त्याचा गौरव करण्यात आला.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD