पुण्यात पावसापेक्षाही विराटचाच गडगडाट जास्त…

Maha Sports

Maha Sports

Author 2019-10-10 13:45:41

img

पुणे | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आज जेव्हा नाणेफेकीला आला तेव्हा त्याने एक खास विक्रम केला. भारताकडून कर्णधार म्हणून ५० कसोटी खेळणारा तो दुसराच खेळाडू ठरला. परंतु विराटने याही पुढे जात आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे.

पुणे कसोटीत विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना आज नाबाद शतकी खेळी केली आहे. तो सध्या १३३ खेळत असून कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत राॅस टेलर आणि दिलीप वेंगसरकर यांना मागे टाकले आहे.

Related Posts

अबब! प्रो कबड्डी विजेत्या संघाची बक्षीस ऐकून व्हाल अवाक्

Oct 11, 2019

२९८६ खेळाडू आजपर्यंत कसोटी खेळले पण हा कारनामा जमला फक्त…

Oct 11, 2019

विराट कोहलीने कसोटीत खेळताना कारकिर्दीत ८१ सामन्यांत ५३.६१च्या सरासरीने ६८६९ धावा केल्या आहेत. त्याने आज ज्या दोन खेळाडूंचा विक्रम मोडला त्यातील राॅस टेलरने ६८३९ तर भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी ६८६८ धावा केल्या आहेत.

यामुळे भारताकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट ७व्या स्थानी विराजमान झाला आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यात सुरु आहे. पहिला सामना भारताने जिंकला असून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD