प्रथमश्रेणी क्रिकेटपटूंनाही करारबद्ध करणार : गांगुली

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-30 04:44:00

img

नवी दिल्ली

बीसीसीआयचे नवे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारतीय क्रिकेटची दिशा बदलून टाकणारा निर्णय घेतला असून प्रथमश्रेणी क्रिकेटपटूंशीही यापुढे करार केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यासाठी त्यांनी वित्त उपसमितीला प्रक्रिया सुरू करण्याची सूचनाही केली आहे.

‘प्रथमश्रेणी क्रिकेटपटूंनाही आता करारबद्ध करण्याची पद्धत सुरू करण्यात येईल. यासाठी वित्त उपसमितीला करारपद्धतीचा आराखडा तयार करण्याची सूचना देण्यात आली आहे. पदाची सूत्रे स्वीकारून चार-पाच दिवसच झाले आहेत. याशिवाय दिवाळीचा ब्रेक आला होता. त्यामुळे सर्व गोष्टींचा आढावा घेण्यासाठी किमान दोन आठवडे तरी लागतील. बऱयाचशा कामांना सुरुवातही करण्यात आली आहे,’ असे गांगुली यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. देशी क्रिकेट आणि क्रिकेटपटूंची स्थिती सुधारण्याकडे आपण सर्वप्रथम लक्ष देणार असल्याचे गांगुली यांनी अध्यक्षपदी निवड निश्चित झाल्यावरच सांगितले होते.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN