बड्डे बाॅय विराट महिन्याला पितो ३६ हजार रुपयांचं पाणी.

Indian News

Indian News

Author 2019-11-05 14:00:01

img

नवी दिल्ली । भारताचा क्रिकेट कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) रोज विक्रम करतोय. परंतु हा नवा विक्रम ऐकून आपण अवाक व्हाल. भारताच्या या कर्णधाराचा महिन्याचा पिण्याचा पाण्याचा (Drinking Water) खर्च अंदाजे ३६,००० रुपये एवढा आहे.

विराट कोहली जे पाणी रोज पितो ते फ्रान्सवरून (France) येते. त्याची भारतात अंदाजे लिटरमागे किंमत आहे ६०० रुपये. एव्हियन (Evian) नावाचे मिनरल वाॅटर (बंद बाटलीतील पाणी) विराट रोज पितो.

फ्रान्समधील ग्रामीण भागात जे नैसर्गिक झरे आहेत तिथेच हे पाणी मिळते. ह्या पाण्याच्या बाटल्या भारतात मोठ्या आणि छोट्या प्रकारात मिळतात. छोटी बाटली अंदाजे २४० रुपयांना मिळते.

भारताचा हा कर्णधार आपल्या आहाराबद्दल अतिशय काळजी करणारा आहे. जेव्हा तो कुठेही बाहेर जातो तेव्हा ह्याच ब्रँडच पाणी पिण्यासाठी मागतो . बऱ्याच वेळा तो स्वतःच पिण्याचं पाणी बरोबर बाळगतो.

जपानमधील कोना निगारी मिनरल वॉटरची किंमत 26 हजार रुपये प्रति लीटर आहे. हे पाणी वजन कमी करण्यासाठी आणि तणावमुक्त राहण्यासाठी पितात. तर अजून एक जपानी ब्रॅंड फिलिक्कोची पाण्याची ७५० मिलीलिटरची बाटली १४ हजार रुपयांना मिळते.

हे महागडे मिनरल वॉटर जास्त करून खेळाडू आणि सेलिब्रिटी पितात. आजकाल भारत आणि जगात खेळाडू आणि सेलेब्रिटी हे आपल्या शरीर आणि आहाराबद्दल काहीसे अधिकच जागरूक झालेले दिसतात.

यात विराट कोहली हे नाव सर्वात वरच्या स्थानी येते. विराटमुळेच अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी आपल्या आहार तसेच दैनंदिन जिवनात बदल केले आहेत.

विराटचा आज ३१वा वाढदिवस असून त्याने भारताकडून एकूण ३९३ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. ज्यात त्याने ५७च्या सरासरीने २१०३६ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट ८व्या स्थानी विराजमान झाला आहे. यात त्याने ६९ शतकं आणि ९८ अर्धशतकं केली आहेत.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD