बांगलादेशकडून कडव्या लढतीची अपेक्षा : लक्ष्मण

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-23 03:04:00

img

वृत्तसंस्था/ रांची

बांगलादेशचा क्रिकेट संघ पुढील महिन्यात भारताच्या दौऱयावर येणार आहे. या दौऱयात उभय संघांमध्ये टी-20 मालिका खेळविली जाणार आहे. विराट कोहलीच्या भारतीय संघाने मंगळवारी दक्षिण आफ्रिका विरूद्धची कसोटी मालिका एकतर्फी जिंकली आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत भारताची सर्वच विभागात सरस कामगिरी झाली आहे. दरम्यान टी-20 मालिकेत बांगलादेशचा संघ भारताला कडवी लढत देईल, असे प्रतिपादन माजी कसोटीवीर व्ही.व्ही. एस.लक्ष्मणने केले आहे.

शकीब अल हसनच्या नेतृत्वाखाली बांगलादेश संघामध्ये दर्जेदार खेळाडू आहेत. अलिकडच्या कालावधीत बांगलादेशचा क्रिकेट दर्जा चांगलाच सुधारल्याचे जाणवते. त्यांच्या कामगिरीत सातत्य दिसून येत असल्याने ही आगामी मालिका चुरसीची होईल, असे लक्ष्मणने म्हटले आहे. 3 नोव्हेंबरला भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला टी-20 सामना दिल्लीत खेळविला जाईल. टी-20 मालिकेनंतर उभय संघांत दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेतील दुसरी आणि शेवटची कसोटी कोलकाताच्या इर्डन गार्डन्सवर 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. या कसोटीसाठी  भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगुलीने बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांना निमंत्रण दिले असून त्यांनी ते स्वीकारले असल्याचे समजते.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD