बांगलादेशविरुद्ध मालिकेसाठी आज संघनिवड

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-24 04:53:00

img

मुंबई

: बांगलादेशविरुद्ध आगामी मालिकेसाठी भारतीय संघाची आज निवड केली जाणार असून यात कर्णधार विराट कोहलीवरील भार आणि ऋषभ पंत-संजू सॅमसन यांच्यापैकी कोणाला पसंती याचा यात निर्णय अपेक्षित आहे. विराटने ऑक्टोबर 2018 पासून 56 पैकी 48 सामने खेळले आहेत. पण, येथे खेळायचे की ब्रेक घ्यायचा याचा निर्णय विराटनेच घ्यावा, असा विद्यमान निवड समितीचा मानस आहे. नवोदित अष्टपैलू शिवम दुबेला संधी देण्याविषयीही येथे विचार होण्याचे संकेत आहेत. बांगलादेशचा संघ या भारत दौऱयात 3 टी-20 सामने होणार असून मालिकेची सुरुवात दि. 3 नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत होईल. याशिवाय, उभय संघात दोन कसोटी सामनेही होणार आहेत.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD