बांगलादेश खेळाडूंचा बहिष्कार

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-22 04:57:00

img

मागण्यांसाठी घेतला निर्णय, भारत दौराही अडचणीत

वृत्तसंस्था/ ढाका

बांगलादेशच्या राष्ट्रीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी मानधनवाढीसह आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत कोणत्याही स्पर्धेत किंवा मालिकेत भाग घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्यांचा आगामी भारत दौराही धोक्यात आला आहे.

बहिष्काराची ही घोषणा सोमवारी अव्वल खेळाडूंनी पत्रकार परिषदेत केली असून त्यात कसोटी व टी-20 संघाचा कर्णधार शकीब अल हसन, मेहमुदुल्लाह, मुश्फिकुर रहीम यांचा समावेश आहे. सुमारे 50 क्रिकेटपटू या बहिष्कारात सहभागी झाले आहेत. त्यांच्या बहिष्कारामुळे विविधक स्पर्धांवर त्याचा परिणाम होणार आहे. सध्या बांगलादेशमध्ये राष्ट्रीय क्रिकेट लीग सुरू असून या लीगलाच सर्वप्रथम बहिष्काराचा फटका बसणार आहे. पुढील महिन्यात बांगलादेश संघ भारत दौऱयावर येणार असून यासाठी घेण्यात येणारे सराव शिबिर आणि नंतरचा दौराही अडचणीत आला आहे.

3 नोव्हेंबर हा दौरा सुरू होणार असून या दौऱयात बांगलादेश संघ 3 टी-20, 2 कसोटी सामने खेळार आहे. यासाठी संघाचे फिरकी गोलंदाज सल्लागार डॅनियल व्हेटोरी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव शिबिर याच आठवडय़ात घेतले जाणार होते. बांगलादेशचा अंतर्गत मामला असल्याची सावध प्रतिक्रिया बीसीसीआयने दिली आहे. या घडामोडीवर नजर ठेवली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र बीसीसीआयचे नवे अध्यक्ष सौरव गांगुलींचे खेळाडू व पदाधिकाऱयांशी चांगले संबंध असल्याने यावर निश्चितच तोडगा निघेल, अशी आशाही व्यक्त करण्यात आली.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD