बास्केटबॉलपटूंत मारामारी की अपघातामुळे जखमी?

Beta1 Esakal

Beta1 Esakal

Author 2019-11-09 01:51:41

img

चंडिगड / बंगळूर : अमज्योत सिंग, अमरित पाल आणि अर्षदीप भुल्लर या बास्केटबॉलपटूंविरुद्ध भारतीय महासंघाने चौकशी केली आहे. कोणाचीही परवानगी न घेता शिबिरातून ब्रेक घेतलेले तिघे रस्त्यावरील मारामारीत जखमी झाले. आता त्यांना अपघात झाल्याचा बास्केटबॉल महासंघाचे पदाधिकारी सांगत आहेत, तर अमज्योतने आपल्याला संपवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा केला आहे.

तिघेही बास्केटबॉलपटू मार्गदर्शकांना न सांगता शिबिरातून मजा करायला गेल्याचा आरोप होत आहे. महासंघाचे सचिव चंदरमुखी शर्मा यांनी खेळाडू शिबिरात ब्रेक असताना मार्गदर्शकांना काहीही कल्पना न देता बाहेर पडले. त्यांना परतताना अपघात झाला. या अपघाताबद्दल हे खेळाडू दुसऱ्याला दोष देत असल्याचेही शर्मा यांनी सांगितले.

अमज्योतने आपल्याला अन्य दोन खेळाडूंनी मद्यसेवन करण्यास भाग पाडले, त्यावरून आमची बाचाबाची झाली. त्यानंतर हॉस्टेलमध्ये अर्षदीपने माझ्यावर हल्ला केला. त्यात माझी सोन्याची चेन तुटली. त्याने माझी मानगूट पकडली. त्याने मला पंजाबमध्ये येऊ नकोस, असेही बजावले, असा दावा अमज्योतने केला.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्यावेळी अमज्योतने अर्षदीप यांच्यात मारामारी झाली होती. त्यामुळे अमज्योतवर कारवाई झाली होती. बंदी उठल्यावर अमज्योतने समाजमाध्यमांवर लिहिलेल्या टिपण्णीवरून अर्षदीप संतापल्याचेही सांगितले जात आहे.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD