बिर्याणी खाल्ल्यावर शमी काहीही करु शकतो : रोहित शर्मा 

Beta1 Esakal

Beta1 Esakal

Author 2019-10-07 16:33:50

img

विशाखापट्टणम : पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 191 धावांमधे गुंडाळून भारतीय संघाने 203 धावांचा भलामोठा विजय साकारला आणि तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 आघाडी घेतली. महंमद शमीने पाच फलंदाजांना बाद करून पाचव्या दिवशी मोलाची कामगिरी बजावली. सामन्यानंतर त्याचे कौतुक करताना तो बिर्याणी खाल्ल्यावर भेदक गोलंदाजी करतो असे मत व्यक्त केले. 

तो म्हणाला, ''महंमद शमीची गोलंदाजी भयंकर भेदक होती. तो सतत उजव्या स्टंपच्या जवळपास मारा करतो. त्याचा जुना चेंडू रिव्हर्ससुद्धा होतो. त्याचा वेगही लक्षणीय आहे. पाचव्या दिवशी महंमद शमीने फलंदाजांची भंबेरी उडवली. त्याचा चेंडू खेळावा का सोडावा या द्विधा मन:स्थितीत फलंदाज अडकले. तो फ्रेश असला आणि त्याने बिर्याणी खाल्लेली असली की तो काय करु शकतो हे आपण पाहिलेचं.''

दरम्यान विशाखापट्टणम सामन्याच्या शेवटच्या दिवस भारतीय फिरकी गोलंदाज गाजवतील अशी खात्री होती पण त्यात महंमद शमीचे नांव असेल असे वाटले नव्हते. पाचव्या दिवसाची चांगली सुरुवात अश्विनने डी ब्रुईनला बोल्ड करून करून दिली. त्यानंतर मैदानावर महंमद शमीच्या वेगवान गोलंदाजीचे राज्य होते. शमीने टेंबा बवुमा, कर्णधार फाफ डु प्लेसी आणि पहिल्या डावात झकास शतक ठोकणार्‍या क्वींटन डीकॉक या तीनही बिनीच्या फलंदाजांना बोल्ड केले. शमीने नेम धरून वेगवान आणि स्टंपात मारा केला.  

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD