बीसीसीआयच्या अध्यक्षपदी गांगुली

Deshdoot

Deshdoot

Author 2019-10-15 02:26:00

img

मुंबई। भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. बीसीसीआचे माजी उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आज याबाबत घोषणा केली. 13 ऑक्टोबरला रात्री उशीरापर्यंत झालेल्या बैठकीत सौरव गांगुलीच्या नावावर अधिकृच शिक्कामोर्तब करण्यात आला. दरम्यान सोमवारी, 14 ऑक्टोबरला राजीव शुक्ला यांनी याबाबत नियुक्ती केली.

बीसीसीआयसारख्या मोठ्या संस्थेची जबाबदारी सांभाळणे हे गांगुलीसाठी आव्हान असेल असे शुक्ला यांनी म्हटले आहे. रविवारी बीसीसीआयच्या झालेल्या बैठकीत गांगुलीची अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. मया नियुक्तीमुळे मी आनंदी आहे. बीसीसीआयची प्रतिमा मलिन झाली असल्याने माझ्यासाठी काहीतरी करून दाखवण्याची ही योग्य संधी आहे. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये भारत हा शक्तिशाली देश आहे. तुम्ही जरी बिनविरोध निवडले गेले असाल तरी, एवढ्या मोठ्या संस्थेची जबाबदारी मोठी गोष्ट आहेफ, असे गांगुलीने नियुक्ती झाल्यावर म्हटले.

आगामी आयपीएलच्या हंगामासाठी गांगुलीला चेअरमनपद देण्यात आले होते. मात्र त्याने ते नाकारले. त्यामुळे गांगुलीऐवजी बृजेश पटेल यांना चेअरमनपद सोपवण्यात आले आहे. बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार, एक व्यक्ती एकापेक्षा जास्त पदावर राहू शकत नाही. त्यामुळे 47 वर्षीय गांगुली फक्त एका वर्षासाठी बीसीसीआयच्या अध्यक्षपदी राहणार असून पुढच्या वर्षी तो मकूलिंग ऑॅफ पीरियडफ मध्ये जाईल. गांगुली मागील पाच वर्षांपासून बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी कार्यरत आहे.राजीव शुक्ला यांनी याबाबत माहिती देताना, आम्ही सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. तरी, 23 ऑक्टोबरला याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल, असे सांगितले. 23 ऑक्टोबर रोजी बीसीसीआयची निवडणुक होणार आहे. दरम्यान अध्यक्षपदासाठी सौरव गांगुलीनं एकट्यानं फॉर्म भरल्यामुळं बिनविरोधात निवड झाली आहे.तर, केंद्रीय मंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा सचिव असतील. मैदानात भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केलेल्या 47 वर्षीय गांगुली सध्या बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे. जर गांगुलीची आता बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली तर तो सप्टेंबर 2020पर्यंत या पदावर राहू शकेल.

ममता बॅनजींर्नी केले अभिनंदन
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय)अध्यक्षपदी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची निवड निश्चित समजली जात आहे. अद्याप यांची घोषणा करण्यात आलेली नसली तरी, गांगुलीचे पारडे जड आहे. मात्र, निवड होण्यापूर्वीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनजींर्नी गांगुलीचे अभिनंदन केले आहे. .

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN