बीसीसीआयच्या बैठकीपासून श्रीनिवासन अलिप्त राहणार

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-06 04:34:00

img

वृत्तसंस्था/ मुंबई

येथे 23 ऑक्टोंबर रोजी होणाऱया भारतीय क्रिकेट मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीला एन श्रीनिवासन उपस्थित राहणार नाहीत. गेल्या आठवडाभराच्या कालावधीत श्रीनिवासन यांनी मंडळाच्या प्रशासकीय समितीबरोबर विविध डावपेच आखले होते. तामिळनाडू क्रिकेट संघटनेची कार्यकारिणी समितीची बैठक येथे गेल्या गुरूवारी झाली आणि या संघटनेतर्फे नव्याने नियुक्त केलेले सरचिटणीस आर.एस. रामस्वामी हे भारतीय क्रिकेट मंडळाच्या सर्वसाधारण बैठकीला तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

एन. श्रीनिवासन हे भारतीय क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष असून पुन्हा अध्यक्षपदासाठी वयोमर्यादा 70 वर्षे केली आहे. त्यामुळे या पदासाठी 73 वर्षीय श्रीनिवासन पात्र ठरू शकणार नाहीत. श्रीनिवासन यांनी स्वत:हून भारतीय क्रिकेट मंडळाच्या आगामी सर्वसाधारण बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN