बीसीसीआयमध्ये सौरव गांगुलीच्या दादागिरीला सुरुवात!

Indian News

Indian News

Author 2019-10-23 15:51:15

img

भारताचा माजी दिग्गज कर्णधार सौरव गांगुलीला बीसीसीआयच्या अध्यक्षपदी आज(23 ऑक्टोबर) अधिकृतरित्या नियुक्त करण्यात आले आहे. तो बीसीसीआयचा 39 वा अध्यक्ष बनला आहे.

त्याच्या नियुक्तीबरोबरच सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयसाठी नेमलेल्या प्रशासन समीतीचे शासन 33 महिन्यांनंतर संपुष्टात आले आहे.

गांगुलीचा बीसीसीआय अध्यक्षपदाचा कार्यकाळ जुलै 2020 पर्यंत असणार आहे. त्यानंतर त्याला कुलिंग ऑफ पिरियड(विश्रांती) घेणे अनिवार्य असेल.

बीसीसीयच्या नियमानुसार कोणत्याही पदापवर 6 वर्षे झाल्यानंतर त्या व्यक्तीला कूलिंग ऑफ पिरियड(विश्रांती) अनिवार्य आहे. गांगुली याआधी मागील 5 वर्षे बंगाल क्रिकेट असोसिएशनमध्ये पदाधिकारी होता.

त्यामुळे त्याला 9 महिने बीसीसीआय अध्यक्षपद सांभाळल्यानंतर कुलिंग ऑफ पिरियड घ्यावा लागेल.

त्याचबरोबर गांगुलीसह बीसीसीआयच्या या प्रशासन मंडळात माहिम वर्मा हे उपाध्यक्ष असणार आहेत.

तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाहकडे सचिवपदाची तर बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकुर यांचा लहान भाऊ अरुण धूमलकडे खजिनदार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर केरळचे जयेश जॉर्ज सहसचिवपदी असणार आहेत.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD