बुमराह, मानधना यांना विस्डेन पुरस्कार

Deshdoot

Deshdoot

Author 2019-10-27 18:29:00

img

मुंबई : विस्डेन इंडिया अलमॅनेकतर्फे २०१८-१९ च्या क्रिकेट हंगामासाठी भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह तसेच महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना यांची निवड करण्यात आली आहे.

विस्डेनच्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कार यादीमध्ये आशियातील क्रिकेटपटू पाकचा फक्र झमान, लंकेचा डी. करूणारत्ने आणि अफगाणचा फिरकी गोलंदाज रशीद खान यांचा समावेश आहे. शुक्रवारी विस्डेन पुरस्कार यादी घोषित करण्यात आली.

विस्डेनचा हा पुरस्कार मिळविणारी स्मृती मानधना ही भारताची तिसरी महिला क्रिकेटपटू आहे. यापूर्वी मिथाली राज आणि दिप्ती शर्मा यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. विस्डेन इंडिया हॉल ऑफ फेममध्ये माजी कसोटीवीर गुंडाप्पा विश्वनाथ आणि लाला अमरनाथ यांचा समावेश करण्यात आला आहे.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD