बुमराह म्हणतो, विराटमुळे मला हॅट्रिक मिळाली, पहा व्हिडिओ

Maha Sports

Maha Sports

Author 2019-09-01 15:40:42

img

सबिना पार्क, किंग्स्टन येथे वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर वेस्ट इंडीजने पहिल्या डावात 7 बाद 87 धावा केल्या आहेत. दुसऱ्या दिवशी भारताकडून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने 6 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याच्या हॅट्रिकचाही समावेश आहे.

त्याने वेस्ट इंडीजच्या पहिल्या डावात 9 व्या षटकात हा कारनामा केला. त्याने या षटकातील दुसऱ्या चेंडूवर डॅरेन ब्रावोला(4), तिसऱ्या चेंडूवर शामर्ह ब्रुक्स(0) आणि चौथ्या चेंडूवर रोस्टन चेसला(0) बाद करत कसोटी कारकिर्दीतील पहिली हॅट्रिक घेतली.

ही हॅट्रिक घेताना त्याने जेव्हा चेसला बाद केले त्यावेळी आधी पंचानी चेस नाबाद असल्याचा निर्णय दिला होता. परंतू नंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला. या रिव्ह्यूमध्ये चेस पायचीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पंचांना त्यांचा निर्णय बदलावा लागला आणि बुमराहला त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिली हॅट्रिक मिळाली.

या रिव्ह्यूबद्दल दुसरा दिवसानंतर विराटशी बोलताना बुमराह म्हणाला, ‘ मला माहित नाही, मला या विकेटची खात्री नव्हती. मी विचार केला की चेंडू बॅटला लागला असावा. त्यामुऴे मी मोठे अपील केले नाही पण अखेर हा चांगला रिव्ह्यू होता. त्यामुळे मला वाटते या हॅट्रिकचे श्रेय विराटला आहे.’

तसेच अन्य गोलंदाजांबद्दल बुमराह म्हणाला, ‘काहीवेळेस विकेट मिळण्यामध्ये खूप मदत झालेली असते. आम्ही एकमेकांना चांगले समजून घेतो. आम्ही मैदानात आणि मैदानाबाहेर संवाद साधत असतो.’

‘जेव्हा मला विकेट मिळते. तेव्हा कोणीतरी दुसरे प्रतिस्पर्ध्यांवर दबाव निर्माण करत असतो. जेव्हा कोणालातरी विकेट मिळत असते तेव्हा फलंदाजांवर दबाव निर्माण करण्याची माझी जबाबदारी असते. आम्ही एकमेकांना मदत करत असतो.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD