बुमराह लवकरच संघात परतणार

Pudhari

Pudhari

Author 2019-11-02 23:07:56

img

बंगळूर : वृत्तसंस्था

भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. गेले काही दिवस दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर असलेला जसप्रीत बुमराह लवकरच भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. जसप्रीत बुमराह सध्या आपल्या दुखापतीमधून चांगल्या पद्धतीने सावरत असून आगामी वर्षात ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत तो भारतीय संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

बुमराहला झालेल्या दुखापतीमुळे त्याला उपचाराकरता इंग्लंडला नेण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट झाले. दिवाळीच्या दिवसांमध्ये जसप्रीतने व्यायामावर भर दिल्यामुळे तो लवकरच बरा होईल, असे वैद्यकीय पथकातील एका सूत्राने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

जानेवारी महिन्याच्या अखेरीस भारतीय संघ न्यूझीलंड दौर्‍यावर जाणार आहे. या दौर्‍यात भारतीय संघ 2 कसोटी, 3 वन-डे आणि 5 टी-20 सामने खेळेल. त्याआधी घरच्या मैदानावर भारताला श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाचा सामना करायचा आहे. या मालिकेत बुमराह भारतीय संघात पुनरागमन करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD