बेन स्टोक्सवर पत्नीचा गळा दाबल्याचा आरोप, पत्नी म्हणते....

Abpmajha

Abpmajha

Author 2019-10-09 16:44:00

img

मुंबई : इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटर बेन स्टोक्स वादात सापडला आहे. पत्नीला मारहाण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पण या प्रकरणाला जास्तच महत्त्व दिलं जात असल्याचं समजल्यानंतर त्याची पत्नी क्लेअर स्टोक्सने सत्य कथन केलं. ती म्हणाली की, "बेनने माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याचं वृत्त खोटं आहे."

हे प्रकरण प्रोफेशनल क्रिकेटर्स असोसिएशन अॅवॉर्डमधील एका पार्टीतलं आहे. ज्यात बेन स्टोक्सचा हात त्याच्या पत्नीच्या गळ्यावर आहे. त्यानंतर लगेचच हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. मग स्टोक्सची पत्नी क्लेअरने यावर स्पष्टीकरण दिलं.

ट्विटरवर क्लेअर म्हणाली की, "लोक एवढं सगळं कसं बनवतात, यावर माझा विश्वास बसत नाही. मी आणि बेन मस्करीत एकमेकांचं तोंड दाबत होतो. यातून आम्ही प्रेमही व्यक्त करत होतो, पण लोकांनी याची गोष्ट बनवली. यानंतर आम्ही मॅक्डॉनल्ड्समध्येही गेलो."


2019 च्या विश्वचषकात इंग्लंडच्या विजयाचा नायक ठरलेल्या बेन स्टोक्सने क्लेअरचं ट्वीट रिट्वीटही केलं.

दुसरीकडे इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे (ECB) प्रमुख टॉम हॅरिसन म्हणाले की, आम्ही कार्यक्रमात आलेल्या अनेक लोकांशी बातचीत केली, पण सगळ्यांनी एकच गोष्ट सांगितली - हे फक्त प्रेम होतं.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD