भारताची जीएस लक्ष्मी आयसीसीची पहिली महिला सामनाधिकारी

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-11 03:27:00

img

दुबई :

आयसीसीच्या पुरूषांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी होणाऱया 2019 च्या पात्र फेरी लीग स्पर्धेत भारताच्या जीएस लक्ष्मी यांचा आयसीसीने घोषित केलेल्या सामनाधिकारी यादीमध्ये समावेश झाला आहे. आयसीसीतर्फे 12 पंचांची यादी जाहीर करण्यात आली आहे. संयुक्त अरब अमिरातमध्ये 18 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान होणाऱया आयसीसी पुरूषांच्या टी-20 विश्वचषक पात्र फेरी 2019 च्या स्पर्धेत भारताच्या जीएस लक्ष्मी सामनाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. या स्पर्धेसाठी न्यूझीलंडचे माजी कर्णधार जेफ क्रो आणि जीएस लक्ष्मी यांचा सामनाधिकाऱयांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. जेफ क्रो यांनी आतापर्यंत 488 आंतरराष्ट्रीय सामन्यात सामनाधिकारीपद सांभाळले आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN