भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी विंडीज महिला संघाची घोषणा

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-28 05:02:00

img

वृत्तसंस्था/ सेंट जोन्स

पुढील महिन्यात भारताविरुद्ध होणाऱया वनडे मालिकेसाठी रविवारी 14 सदस्यीय विंडीज महिला संघाची घोषणा करण्यात आली. या मालिकेसाठी स्टेफानी टेलरकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली असल्याचे माहिती विंडीज निवड समितीचे अध्यक्ष ऍन ब्राऊन यांनी दिली. उभय संघात तीन वनडे व पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना दि. 1 रोजी सर व्हिव्हियन रिचर्ड्स मैदानावर खेळवण्यात येणार आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या वेगवान गोलंदाज शोनिशा हेक्टर व अष्टपैलू ऍलेन यांना संघात स्थान मिळाले आहे. दुखापतीमुळे अनुभवी गोलंदाज डिआंड्रा डॉटिन मात्र या मालिकेत खेळणार नाही.

विंडीज महिला संघ – स्टेफानी टेलर (कर्णधार), अनिसा मोहम्मद, ऍलेन, ऍफी फ्लेचर, ब्रिटनी कुपर, चिडॉन नेशन, चिनली हेन्री, स्टॅकी किंग, कायशोना नाईट, नताशा मॅक्लेन, शबिका गजबानी, शोनिशा हेक्टर, शेमिन कॅप्बेल व गिरीमोंड.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD