भारतासाठी आनंदाची बातमी जसप्रीत बुमराह लवकरच परतणार
मुंबई । । बांगलादेशविरुद्ध मालिकेसाठी सज्ज झालेल्या भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. गेले काही दिवस दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर असलेला जसप्रीत बुमराह लवकरच भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. जसप्रीत बुमराह सध्या आपल्या दुखापतीमधून चांगल्या पद्धतीने सावरत असून आगामी वर्षात ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत तो भारतीय संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
आयपीएलमध्ये बुमराहला दुखापत झाली होती. त्यानंतर तो विश्वचषकात खेळला पण वेस्टइंडिज दौर्यात त्याला पुन्हा एकदा दुखापत झाली. ही दुखापत गंभीर असल्याचे म्हटले गेले होते. हार्दिक पंड्याला आशिया चषकाच्यावेळी दुखापत झाली होती. त्यानंतर विश्वचषकात तो खेळला पण त्यानंतर पुन्हा एका त्याला दुखापतीने ग्रासले पण या दोघांची दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याचे कळते. कारण या वर्षात हे दोघे एकही सामना खेळणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
बुमराहला झालेल्या दुखापतीमुळे त्याला उपचाराकरता इंग्लंडला नेण्यात आलं होतं. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज नसल्याचं स्पष्ट झालं. दिवाळीच्या दिवसांमध्ये जसप्रीतने व्यायामावर भर दिल्यामुळे तो लवकरच बरा होईल, असं वैद्यकीय पथकातील एका सुत्राने खछड वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
जानेवारी महिन्याच्या अखेरीस भारतीय संघ न्यूझीलंड दौर्यावर जाणार आहे. या दौर्यात भारतीय संघ 2 कसोटी, 3 वन-डे आणि 5 टी-20 सामने खेळेल. त्याआधी घरच्या मैदानावर भारताला श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाचा सामना करायचा आहे. या मालिकेत बुमराह भारतीय संघात पुनरागमन करेल अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे.भारतासाठी आनंदाची बातमी जसप्रीत बुमराह लवकरच परतणार