भारतासाठी खूष खबर; जसप्रीत बुमरा लवकरच मैदानात परतणार

Indian News

Indian News

Author 2019-11-02 17:20:26

img

मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला काही दिवसांपूर्वी दुखापत झाली होती. बांगलादेशविरुद्ध जेव्हा भारताचा संघ निवडण्यात आला तेव्हा त्याचे पुनरागमन होईल, असे वाटत होते. पण या संघात मात्र त्याला स्थान देण्यात आले नाही. त्यानंतर सध्याच्या घडीला बुमराबद्दल अपडेट आले आहेत. त्यानुसार बुमरा लवकरच मैदानात परतणार असल्याचे म्हटले जात आहे.

आयपीएलमध्ये बुमराला दुखापत झाली होती. त्यानंतर तो विश्वचचषकात खेळला. पण वेस्ट इंडिज दौऱ्यात त्याला पुन्हा एकदा दुखापत झाली. ही दुखापत गंभीर असल्याचे म्हटले गेले होते. हार्दिक पंड्याला आशिया चषकाच्यावेळी दुखापत झाली होती.

त्यानंतर विश्वचषकात तो खेळला पण त्यानंतर पुन्हा एकदा त्याला दुखापतीने ग्रासले. पण या दोघांची दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याचे कळते. कारण या वर्षात हे दोघे एकही सामना खेळणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

दिवाळीनंतर जसप्रीत बुमराच्या दुखापतीबाबत अपडेट घेण्यात आले. या अपडेटनुसार बुमराच्या दुखापतीमध्ये सुधारणा होत आहे. या अपडेटनुसार बुमरा पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाबरोबर होणाऱ्या मालिकेमध्ये तो पुनरागमन करणार असल्याचे समजत आहे.

सौरव गांगुलीनं टीम इंडियाचं नेतृत्व सोपवलं रोहित शर्माकडे
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका यजमानांनी 3-0 अशी जिंकली. या मालिकेनंतर भारतीय संघ बांगलादेशचा सामना करणार आहे. बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. तीन ट्वेंटी-20 आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आज टीम इंडियाची निवड केली गेली. या बैठकीला बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष सौरव गांगुली, निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद आणि कर्णधार विराट कोहली उपस्थित होते. ट्वेंटी-20 साठी जाहीर केलेल्या टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे.

भारतीय संघ ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीनं विचार करत आहे. त्यामुळे ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सर्वोत्तम संघ निवडण्याची प्रक्रिया आतापासूनच सुरु झाली आहे. त्यामुळे अधिकाधिक युवा खेळाडूंना संधी देऊन त्याची चाचपणी केली जाणार आहे. त्यात संघातील वरिष्ठ खेळाडूंवर पडणारा ताणही लक्षात घेतला जाणार आहे. म्हणूनच बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्याचा विचार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) करत होते. त्यामुळे या मालिकेत कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे.

भारताचा ट्वेंटी-20 संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत ( यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या, युजवेंद्र चहल, राहुल चहर, दीपक चहर, खलील अहमद, शिवम दुबे, शार्दूल ठाकूर

बांगलादेशचा ट्वेंटी-20 संघ - शकिब अल हसन ( कर्णधार), तमीम इक्बाल, लिटन दास, सौम्या सरकार, नैम शेख, मुश्फीकर रहीम, महमुदुल्लाह, अफीफ होसैन, मोसादेक होसैन, अनिमुल इस्लाम, अराफत सन्नी, मोहम्मद सैफुद्दीन, अल-अमीन होसैन, मुस्ताफिजूर रहमान, सफीऊल इस्लाम.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD