भारतीय महिलांचा मालिका विजय

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-11-16 05:04:00

img

तिसऱया टी-20 सामन्यात विंडीजवर 7 गडय़ांनी मात,

वृत्तसंस्था/ गयाना

भारतीय महिला संघाने यजमान विंडीज संघाचा तिसऱया टी-20 सामन्यात सहज पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱया विंडीज संघाला 9 बाद 59 धावापर्यंत मजल मारता आली. यानंतर विजयासाठीचे 60 धावांचे माफक लक्ष्य भारतीय संघाने 7 गडय़ांच्या मोबदल्यात पूर्ण करत विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. संयमी खेळी साकारणाऱया जेमिमा रॉड्रिग्जला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. आता, उभय संघातील चौथा सामना दि. 17 रोजी होईल.

प्रारंभी, नाणेफेक जिंकून विंडीजने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण कर्णधार अनिसा मोहम्मदचा हा निर्णय चुकीचा ठरला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱयासमोर विंडीजच्या 8 फलंदाजांना दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही. विंडीजकडून चेडॉन नेशन आणि सीनल हेन्री यांनी सर्वाधिक 11 धावा केल्या. भारताच्या राधा यादव व दीप्ती शर्माने प्रत्येकी 2 तर अनुजा पाटील, पूजा वस्त्राकार, हरमनप्रीत कौर आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

विजयासाठी मिळालेल्या 60 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली. मागील दोन सामन्यात अर्धशतकी खेळी साकारणाऱया सलामीवीर शेफाली वर्माला या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. स्मृती मानधना (3) व कर्णधार हरमनप्रीत कौर (7) धावांवर बाद झाल्याने भारताची 3 बाद 37 अशी स्थिती झाली होती. पण जेमिमा रॉड्रीग्जने 51 चेंडूत 7 चौकारासह नाबाद 40 धावांची खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. दीप्ती शर्माने नाबाद 7 धावा करत तिला चांगली साथ दिली. हे विजयी लक्ष्य टीम इंडियाने 16.4 षटकांत पूर्ण केले. विंडीजकडून मॅथ्यूजने 2 गडय़ांना टिपले.

संक्षिप्त धावफलक : विंडीज महिला संघ 20 षटकांत 9 बाद 59 (चेडॉन नेशन 11, सीनल हेन्री 11, राधा यादव 2/6, दीप्ती शर्मा 2/12, हरमनप्रीत 1/11, अनुजा पाटील 1/13)

भारतीय महिला संघ 16.4 षटकांत 3 बाद 60 (मानधना 3, जेमिमा रॉड्रिग्ज नाबाद 40, हरमनप्रीत 7, दीप्ती शर्मा नाबाद 7, मॅथ्यूज 2/7).

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD