भारतीय महिला संघ विजयी आघाडीसाठी उत्सुक!

Loksatta

Loksatta

Author 2019-10-11 05:26:56

img

भारत-द. आफ्रिका क्रिकेट मालिका

वृत्तसंस्था, सुरत

पदार्पणवीर प्रिया पुनियाच्या दमदार कामगिरीच्या बळावर पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात पाहुण्या दक्षिण आफ्रिकेला धूळ चारल्यानंतर शुक्रवारी रंगणाऱ्या दुसऱ्या सामन्यातही सरशी साधून मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी भारतीय महिला संघ उत्सुक आहे.

कर्णधार मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताने पहिल्या लढतीत आफ्रिकेवर आठ गडी आणि ५० चेंडू राखून विजय मिळवला. सलामीवीर प्रिया (नाबाद ७५) आणि जेमिमा रॉड्रिग्ज (५५) यांनी भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. विशेषत: अनुभवी सलामीवीर स्मृती मानधनाच्या अनुपस्थितीत प्रियाने सुरेख खेळ केला. त्यामुळे मधल्या फळीतील हरमनप्रीत कौर, तानिया भाटिया आणि दीप्ती शर्मा यांना फलंदाजीची संधीच आली नाही. गोलंदाजीत अनुभवी झुलन गोस्वामी आणि शिखा पांडे वेगवान माऱ्याची धुरा समर्थपणे वाहत आहेत. तर पूनम यादव आणि एकता बिश्त प्रतिस्पर्धी फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात अडकवण्यासाठी सज्ज आहेत.

दुसरीकडे आफ्रिकेची मदार प्रामुख्याने पहिल्या सामन्यातील अर्धशतकवीर मॅरीझेन कॅप आणि वेगवान गोलंदाज नॅडिन डीक्लर्क यांच्यावर आहे. यापूर्वी ट्वेण्टी-२० मालिकासुद्धा १-२ अशा फरकाने गमावल्यामुळे आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे.

सामन्याची वेळ : सकाळी ९ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN