भारतीय संघात नागरकोटीचे पुनरागमन

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-03 05:16:00

img

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आगामी इमर्जिंग आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघामध्ये युवा वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटीचे पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे तब्बल 19 महिने क्रिकेटपासून अलिप्त होता.

गेल्यावर्षी न्यूझीलंडमध्ये झालेल्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाच्या यशामध्ये कमलेश नागकोटीचा वाटा महत्वाचा होता. दरम्यान या स्पर्धेनंतर कमलेशला पाठीचा भाग तसेच घोटा आणि टाच या परिसरात स्ट्रेस प्रॅक्चर झाल्याने त्याच्यावर तज्ञ डॉक्टरांचा बेंगळूरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये वैद्यकीय इलाज चालू होता. राजस्थान संघाकडून खेळताना 19 वर्षीय नागरकोटीने अ क्रिकेट स्पर्धेत हॅट्ट्रीक नोंदविली होती तसेच त्याने आपला शेवटचा सामना गेल्यावर्षी विजय हजारे करंडक क्रिकेट स्स्पर्धेत खेळला होता. मुंबईत सोमवारी कनिष्ठ निवड समितीच्या बैठकीमध्ये भारतीय संघाची निवड करण्यात आली. ही स्पर्धा बांगलादेशमध्ये नोव्हेंबर महिन्यात खेळविली जाईल.

भारतीय संघ- विनायक गुप्ता, आर्यन जुयाल, बी.आर. शरथ, चिन्मय सुतार, यश राठोड, ए.जाफर, सनवीर सिंग, कमलेश नागरकोटी, हार्दिक शौकिन, एस.ए. देसाई, अर्षदीप सिंग, दुबे, कुमार सुरज, रेखडे आणि कुलदीप यादव.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN