भारतीय संघाने रचला इतिहास; द. अफ्रिकेचा 202 धावांनी पराभव

Indian News

Indian News

Author 2019-10-22 13:00:41

img

नवी दिल्ली । दक्षिण अफ्रिकेविरोधातील कसोटी मालिकेमध्ये भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. या मालिकेतील अखेरच्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवत इतिहास रचला आहे. भारताने या सामन्यात अफ्रिकेचा 202 धावांनी पराभव केला आहे. विजयासह भारताने ही मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली आहे. दरम्यान, या तिसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करण्याच निर्णय घेतला आणि 497 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा पहिला डाव 162 धावांवर तर फॉलो-ऑन नंतरचा डाव 133 धावांवर आटोपला. पहिल्या डावातील अपयशामुळे आफ्रिकेवर फॉलो-ऑनची नामुष्की ओढवली. त्यानंतर दुसऱ्या डावातही आफ्रिकेच्या खेळाडूंनी खराब कामगिरी केली.

डी कॉक, हामझा, बावुमा, हामझा आणि क्लासें या फलंदाजांना दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही.

सलामीवीर डीन एल्गरला चेंडू लागल्याने तो 16 धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. त्याच्या जागी आलेला बदली खेळाडू डे ब्रून याने आफ्रिकेच्या तळाच्या फलंदाजांना हाताशी घेत आजचा पराभव उद्यावर ढकलला. मात्र, चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला अणि अवघ्या काही मिनिटांमध्येच खेळ संपला. डे ब्रून (30) आणि लुंगी एन्गीडी नदीमच्या सलग दोन चेंडूवर बाद झाले. मोहम्मद शमीने 3, उमेश यादव आणि शाहबाज नदीम 2-2, तर जाडेजा व अश्विनने 1-1 बळी टिपला.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD