भारत दौऱयासाठी बांगलादेश टी-20 संघ जाहीर

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-19 05:09:00

img

वृत्तसंस्था/ ढाका

बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या निवड समितीने आगामी भारत दौऱयासाठी बांगलादेशच्या टी-20 संघाची घोषणा केली आहे. या दौऱयात बांगलादेश संघ भारताविरुद्ध 3 टी-20 आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. विशेष म्हणजे, तमिम इक्बाल व सौम्या सरकार या दोन्ही अनुभवी खेळाडूंचे बांगलादेश संघात पुनरागमन झाले आहे. अपेक्षेप्रमाणे शकीब अल हसनकडे नेतृत्वाची धुरा कायम ठेवण्यात आली आहे. दरम्यान, 3 नोव्हेंबरपासून या दौऱयाला सुरुवात होणार असून पहिला टी-20 सामना दिल्लीत खेळवला जाणार आहे.

टी-20 मालिकेसाठी बांगलादेशचा संघ –

शकीब अल हसन (कर्णधार), तमिम इक्बाल, लिटन दास, सौम्या सरकार, मुश्फिकुर रहिम, मेहमुदुदल्लाह, मोहम्मद नईम, मोसादेक होसेन, अफिफ हुसैन, अराफत सनी, मोहम्मद सैफुद्दीन, अमिनुल इस्लाम, अल-अमिन हुसैन, मुस्तफिजूर रेहमान, शफीउल इस्लाम.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD