भारत-बांगलादेश मालिका नक्की होणार!
मुंबई : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्या संमतीमुळे भारत-बांगलादेश यांच्यातील मालिका नियोजित वेळापत्रकानुसार नक्की होईल, असा आशावाद ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष सौरव गांगुलीने व्यक्त केला.
पगारवाढीसह अन्य काही मागण्यांची पूर्तता होत नाही, तोपर्यंत कोणत्याही क्रिकेट सामन्यात खेळणार नसल्याची भूमिका बांगलादेशच्या खेळाडूंनी घेतली आहे. कर्णधार शाकिब अल हसन, महमदुल्ला, मुशफिकर रहिम या बांगलादेशच्या प्रमुख खेळाडूंव्यतिरिक्त अन्य स्थानिक क्रिकेटपटूंचाही समावेश आहे.
माजी क्रिकेटपटूंचा पाठिंबा
ढाका : बांगलादेश क्रिकेट संघातील खेळाडूंच्या संपावर जाण्याच्या निर्णयाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या महासंघातील काही खेळाडूंनी पाठिंबा दर्शवला आहे.
मोर्तझा मध्यस्थ
खेळाडू आणि क्रिकेट मंडळातील वाद सोडवण्यासाठी बांगलादेशच्या पंतप्रधान हसिना शेख यांनी माजी कर्णधार मश्रफी मोर्तझाची मध्यस्थ म्हणून नेमणूक केली आहे.