भारत ब संघाला जेतेपद
केदार जाधव आणि यशस्वी जैस्वाल यांनी केलेल्या अर्धशतकांमुळे भारत ब संघाने अंतिम सामन्यात भारत क संघावर ५१ धावांनी मात करत देवधर करंडक स्पर्धेचे जेतेपद पटकावले. भारत क संघाला हा सामना जिंकण्यात अपयश आले असले तरी या संघाचा कर्णधार शुभमन गिलने अनोखा विक्रम केला. देवधर करंडकच्या अंतिम सामन्यात खेळणार्या संघाचे नेतृत्व करणारा तो सर्वात युवा खेळाडू ठरला आहे.