भारत ब संघाला विजेतेपद

Indian News

Indian News

Author 2019-11-05 09:30:07

img

रांची: कृष्णप्पा गौथमची वादळी खेळी तसेच महाराष्ट्राच्या केदार जाधव आणि यशस्वी जैस्वाल यांनी केलेल्या दमदार खेळींच्या जोरावर भारत ब संघाने भारत क संघाचा पराभव केला व प्रथमच देवधर करंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

49 व्या षटकांत पलंदाजीला आलेल्या गौथमने 10 चेंडूत 3 षटकार व 3 चौकार फटकावत ब संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.

या कामगिरीच्या जोरावर ब संघाने क संघासमोर विजयासाठी 284 धावांचे आव्हान ठेवले. या धावांचा पाठलाग करताना 9 बाद 232 असा रोखला गेला व ब संघाने 51 धावांनी विजयासह करंडक जिंकला. शाहबाज नदीमने 32 धावांत 4
गडी बाद केले.

दिनेश कार्तिकचा अफलातून झेल इशान पोरेलच्या गोलंदाजीवर भारत ब संघाचा कर्णधार पार्थिव पटेलच्या बॅटची कड घेऊन चेंडू मागे गेला.

यावेळी दिनेश कार्तिकने चेंडूचा अंदाज घेत उडी मारत एका हातात अफलातून झेल घेतला. कार्तिकच्या या प्रयत्नामुळे पार्थिव पटेल अवघ्या 14 धावा काढून माघारी परतला. सामना कार्तिकच्या संघाने गमावला असला तरी कौतुक कार्तिकच्या झेलाचेच झाले.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD