भारत विजयाच्या उंबरठय़ावर

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-13 16:50:00

img

ऑनलाईन टीम / पुणे :

भारताने पाहुण्या दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱया डावात सात बळी घेत विजयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. भारताने दुसऱया डावात बॅटिंग न करता आफ्रिकेला फॉलोन दिला. दुसऱया डावात तरी पाहुणा संघ भारताला झुंज देईल असे वाटले होते. पण, आफ्रिकेच्या दुसऱया डावताही हरकिरी सुरु ठेवली.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन गहुंजे येथे हा सामना सुरू आहे. भारताने फॉलोन दिल्यानंतरही आफ्रिकेच्या दुसऱया डावताही खराब सुरुवात झाली. इशांत शर्माने मार्करम ला बाद करत पहिला धक्का दिला. डावाच्या पहिल्याच षटकात हा धक्का बसला. त्यानंतर एलगर आणि डी ब्रूएन यांनी दबाव हटवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांचे चौकार बॅटीचे कड घेऊन गेले. त्यांच्या खेळीत आत्मविश्वास नव्हता. आफ्रिकेची धावसंख्या 21 असताना उमेश यादवने ब्रुयन ला बाद साहाकरवी बाद केले. डावीकडे झेपावत त्याने सुंदर कॅच घेतला. त्यानंतर डुप्लसीस ने स्वतःला बढती देत चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आला. त्याने आणि एलगरने धावसंख्या 71 पर्यत पोहोचवली. 71 धावसंख्या असताना डुप्लािसिस बाद झाला. अश्विनने त्याला बॅड केला. पुढे झेपावत साहने उत्कृष्ट झेल घेतला. त्यानंतर 74 धावसंख्या असताना एलगर खराब शॉट मारून अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला. उमेश यादवने मागे पळत जात त्याचा कॅच घेतला. उपहाराला आफ्रिका 4 बाद 74 अशी होती.त्यानंतर उपहारणानंतर दुसऱयाच षटकात जाडेजाने डिकॉक चा त्रिफळा उडवला. त्यानंतर बवूमा आणि मुथुस्वामी ने शतकी टप्पा पार करून दिला. बवूम जाडेजचा शिकार ठरला. तर, लगेच मुथुस्वामी ला शमी ने बंद करून पाहुण्या संघाला सातवा धक्का दिला. आफ्रिकेच्या चहापानापर्यंत 7 बाद 172 धावा झाल्या होत्या.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN