मतदान करण्यासाठी गेलेल्या सचिन बरोबर घडला हा अजब किस्सा

Indian News

Indian News

Author 2019-10-22 21:21:40

img

सोमवारी(21ऑक्टोबर) महाराष्ट्रात 2019च्या विधानसभेसाठी मतदान पार पडले. त्यामुळे सोमवारी मतदान करण्यासाठी विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींनी पोलिंग बूथवर मतदान करण्यासाठी हजेरी लावली होती.

यामध्ये भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर देखील आपल्या परिवारासोबत मतदान करण्यासाठी बांद्रा येथे पोहोचला होता. त्याने आपली पत्नी अंजली तेंडूलकर आणि मुलगा अर्जून तेंडूलकरसोबत बांद्रा येथील पोलिंग बूथवर मतदान केले.

यावेळी बांद्रा येथील पोलिंग बूथवर एक मजेदार किस्सा पाहायला मिळाला. ड्यूटीवर असणाऱ्या पोलिंग अधिकाऱ्याने मतदान करण्यासाठी आलेल्या सचिन तेंडूलकरला ऑटोग्राफ मागितला. सचिननेही त्या अधिकाऱ्याला नाराज न करता क्रिकेटच्या लाल लेदर चेंडूवर ऑटोग्राफ दिले.

पोलिंंग बूथवर मतदान करण्यासाठी आलेल्या सर्व मतदारांसाठी हा क्षण खूपच उत्साहपूर्ण होता. मतदान झाल्यानंतर सचिनने आपल्या परिवारासोबत फोटोही काढले. सचिन मतदानासाठी जागरूक असतो. तसेच लोकांना मतदान करण्यासाठी प्रेरितही करतो.

यावेळीही त्याने ट्विट करत नागरिकांना मतदान करण्याची विनंती केली होती. त्याने ट्विट केले होते की, "मतदान करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. माझं मत मी नोंदवलं आहे, आपण सर्व सुद्धा मतदान करून या लोकशाहीच्या सोहळ्याचा भाग व्हा."

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर 100 शतके करण्याचा विश्वविक्रम आहे. तसेच त्याने 200 कसोटी सामने देखील खेळले आहेत. त्याने 200 कसोटी सामन्यात 51 शतकांसह 15921 धावा केल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 49 शतक आहेत. तसेच वनडे क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर सर्वाधिक 18426 धावा बनवण्याचा विक्रमही आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN