महिलांच्या वनडे मानांकनात भारत दुसऱया स्थानी

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-08 04:33:00

img

वृत्तसंस्था/ दुबई

आयसीसीच्या महिलांच्या ताज्या वनडे मानांकनात भारतीय महिला क्रिकेट संघाने आपले दुसरे स्थान अधिक मजबूत करताना नजीकच्या इंग्लंड संघावर तीन गुणांची आघाडी मिळविली आहे. या मानांकन यादीत ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर असून भारत 125 गुणांसह दुसऱया तर इंग्लंड 122 गुणांसह तिसऱया स्थानावर आहे.

मिथाली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने अलिकडच्या कालावधीत इंग्लंड संघावर तीन गुणांची आघाडी मिळविली. तत्पूर्वी उभय संघातील फरक केवळ एका गुणांचा होता. आयसीसीच्या टी-20 महिलांच्या मानांकनात भारत सध्या पाचव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने आपल्या कामगिरीत सातत्य राखताना वनडे आणि टी-20 या प्रकारात आपले अग्रस्थान अधिक मजबूत केले आहे. गेल्यावर्षी विंडीजमध्ये ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने आयसीसीची महिलांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली होती.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD