मार्करमचे समयोचित दमदार शतक

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-09-28 04:43:00

img

वृत्तसंस्था/ विझियानगरम

द. आफ्रिका आणि बोर्ड अध्यक्ष इलेव्हन यांच्यात येथे सुरू असलेल्या तीन दिवसांच्या सरावाच्या सामन्यात शुक्रवारी खेळाच्या दुसऱया दिवशी द. आफ्रिकेने पहिल्या डावात 50 षटकात 4 बाद 199 धावा जमविल्या. सलामीच्या मार्करमने दमदार शतक (100) झळकविले. बेहुमा 55 धावावर खेळत आहे.

भारताच्या दौऱयावर आलेल्या द. आफ्रिका संघाचा कसोटी मालिकेपूर्वी हा सरावाचा सामना आयोजित केला आहे. मुसळधार पावसामुळे या सामन्यातील पहिल्या दिवसाचा संपूर्ण खेळ वाया गेला तर दुसऱया दिवशी 50 षटकांचा खेळ झाला. द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. द. आफ्रिकेचे इल्गार आणि ब्रुयेन हे दोन फलंदाज लवकर बाद झाले. इल्गारला उमेश यादवने तर ब्रुयेनला पोरेलने बाद केले. डी जडेजाने हमझाला पायचीत केले. त्याने 26 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 22 धावा जमविल्या. जडेजाने द. आफ्रिकेला आणखी एक धक्का देताना कर्णधार डु प्लेसीसला 9 धावावर पायचीत केले. एका बाजूने मार्करमने दमदार फलंदाजी करताना 118 चेंडूत दोन षटकार आणि 18 चौकारासह 100 धावा झळकविल्या. त्यानंतर तो निवृत्त झाला. बेहुमा आणि डु प्लेसीस या जोडीने चौथ्या गडय़ासाठी 121 धावांची भागिदारी केली. बेहुमा 92 चेंडूत 9 चौकारासह 55 धावावर खेळत आहे. भारतातर्फे जडेजाने 2 तर उमेश यादव आणि पोरेल यानी प्रत्येकी 1 गडी बाद केला. भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील पहिली क्रिकेट कसोटी 2 ऑक्टोबरपासून खेळविली जाणार आहे.

संक्षिप्त धावफलक- द आफ्रिका प डाव 50 षटकात 4 बाद 199 (मार्करम दुखापतीने निवृत्त 100, बेहुमा खेळत आहे 55, हमजा 22, जडेजा 2-52, उमेश यादव 1-31, पोरेल 1-11).

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN