माही इज बॅक! ऐतिहासिक कसोटी सामन्यात दिसणार धोनीची झलक

News18

News18

Author 2019-11-05 15:11:00

img

कोलकाता, 05 नोव्हेंबर : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी तीन ते चार महिने क्रिकेटपासून दूर आहे. वर्ल्ड कपमध्ये धोनीनं शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्यानंतर झालेल्या वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश दौऱ्यात धोनीला विश्रांती देण्यात आली. त्यामुळं धोनी निवृत्ती घेणार का, याबबात साशंकता निर्माण झाली आहे. दरम्यान धोनी टी-20 वर्ल्ड कपसाठी तयारी करत असल्याच्या बातम्या येत असताना धोनीबाबत एक महत्त्वाची बातमी आली आहे.

नोव्हेंबरमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या गुलाबी पर्वाची सुरुवात इडन गार्डन्स मैदानावरून होणार आहे. आगामी भारतीय दौऱ्यावर बांगलादेशचा संघ (Bangladesh Cricket Team) इडन गार्डन्स (Eden Gardens)मैदानावर डे/नाईट कसोटी सामना खेळणार आहे. यासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळा(BCCI)ने दिलेल्या प्रस्तावाला बांगलादेश क्रिकेट बोर्डा(Bangldesh Cricket Board)ने हिरवा कंदील दाखवला आहे. जागतिक क्रिकेटमध्ये डे/नाईट कसोटीला आधीच सुरुवात झाली आहे. पण भारतात हा पहिलाच अशा प्रकारचा सामना होत आहे.

हा सामना भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक अशा इडन गार्डन्स (Eden Gardens) मैदानावर होणार आहे. BCCIचे अध्यक्ष सौरव गांगुलीने डे/नाईट कसोटी क्रिकेटचे समर्थन केले होते. यासंदर्भात गांगुलीने बांगलादेशला प्रस्ताव देखील दिला होता. बांगलादेश क्रिकेट संघाच्या व्यवस्थापनाने आणि खेळाडूंनी या प्रस्तावाला होकार दिल्याचे गांगुलीने सांगितले. दरम्यान आता याच सामन्यात धोनी समालोचक म्हणून सामिल होऊ शकतो. 2014मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये निवृत्ती घेणारा धोनी आता समालोचन करताना दिसणार आहे. आयएएनएसनं यासंबंधीत माहिती दिली.

वाचा-राजकारण्यांनी वाऱ्यावर सोडलेल्या शेतकऱ्यांसाठी मराठमोळ्या क्रिकेटपटूचा पुढाकार

वाचा-धोनीच्या भविष्याबद्दल युवराज सिंगचा निवड समितीवर हल्लाबोल

याआधी धोनी रांचीमध्ये भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात दिसला होता. त्यामुळं क्रिकेट चाहत्यांसाठी ही आनंदाची बाब असणार आहे. तब्बल तीन-चार महिन्यांच्या कालावधीनंतर चाहत्यांना धोनीला मैदानावर पाहण्याची संधी मिळणार आहे.

वाचा-दिल्ली प्रदूषणानंतर टीम इंडियावर ‘महा’ चिंता! भारताला गमवावी लागेल मालिका

असे आहेत डे-नाईट सामन्याचे नियम

पारंपारिक कसोटी सामने हे लाल चेंडूवर खेळले जात असले तरी दिवस-रात्र कसोटी सामन्यांमध्ये वापरला जाणारा चेंडू मात्र गुलाबी रंगाचा असतो. रात्री प्रकाशझोतात चेंडू पटकन दिसावा म्हणून हा बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत कुकाबुरा या कंपनीचेच गुलाबी चेंडू वापरले गेले आहेत. इतर प्रथम श्रेणी क्रिकेट प्रमाणेच डे-नाईट टेस्टमध्ये 80 षटकानंतर नवा चेंडू घेता येतो. डे- नाईट कसोटी सामन्यांमध्येसुध्दा दिवसाला सहा तास आणि 90 षटकांच्या खेळाचे नियोजन असते. यात फॉलोऑन नचा नियम डे- नाईट कसोटीसाठी मात्र वेगळा आहे. पारंपरिक कसोटी सामन्यात पहिल्या डावाअखेर 200 धावांची आघाडी असली तर फॉलोऑन देता येता. दिवस -रात्र सामन्यात हीच आघाडी 150 धावांची असली तरी फॉलोऑन देता येतो.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD