मुंबईचा सलग दुसरा विजय

Funny-videos-003

Funny-videos-003

Author 2019-11-11 15:30:00

img

सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफी : हरियाणावर मात

मुंबई
येथे सुरु असलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-20 चषक स्पर्धेत सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील मुंबईने सलग दुसऱया विजयाची नोंद केली. शनिवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात मुंबईने हरियाणाचा 8 गडी राखून पराभव केला. प्रारंभी, हरियाणाने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 153 धावा केल्या. यानंतर, मुंबईने विजयी लक्ष्य 15.4 षटकांत 2 गडयांच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयासह मुंबईला 4 गुण मिळाले. प्रथम फलंदाजी करताना हरियाणाची सुरुवात चांगली झाली. शिवम चौहान व हर्षल पटेल या जोडीने 66 धावांची सलामी दिली.

शिवमने 28 तर हर्षलने 33 धावा फटकावल्या. ही जोडी बाद झाल्यानंतर हिमांशु राणा (6) व सुमीत कुमार (11) या स्टार फलंदाजांनी निराशा केली. यानंतर, चैतन्य बिश्‍नोई (23 चेंडूत 27) व राहुल तेवतिया (16 चेंडूत नाबाद 29) यांनी फटकेबाजी केल्यामुळे हरियाणाला 20 षटकांत 5 बाद 153 धावापर्यंत मजल मारता आली. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला सलामीवीर जय बिस्ताच्या रुपाने पहिला धक्का बसला. बिस्ताने 13 धावा केल्या. यानंतर, आदित्य तरे व सुर्यकुमार यादव या जोडीने दुसऱया गडयासाठी 74 धावांची भागीदारी करत संघाला सावरले. तरेने 28 चेंडूत 6 चौकारासह 39 धावा केल्या. ही जोडी स्थिरावलेली असतानाच तरेला तंबूचा रस्ता धरावा लागला. मात्र, सुर्यकुमार यादवने हरियाणाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करताना 38 चेंडूत 11 चौकार व 3 षटकारासह नाबाद 81 धावा करत संघाला 15.4 षटकांत विजय मिळवून दिला. सिद्धेश लाडने नाबाद 16 धावा करत त्याला चांगली साथ दिली. संक्षिप्त धावफलक : हरियाणा 20 षटकांत 5 बाद 153 (शिवम चौहान 28, हर्षल पटेल 33, राहुल तेवतिया नाबाद 29, तुषार देशपांडे 2/27, धवल कुलकर्णी 1/32). मुंबई 20 षटकांत 2 बाद 154 (आदित्य तरे 39, सुर्यकुमार यादव नाबाद 81, सिद्धेश लाड नाबाद 16, चापराना 1/31, अमित मिश्रा 1/40).

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN