मुंबईचा हरियाणावर विजय

Deshdoot

Deshdoot

Author 2019-11-10 02:42:00

img

मुंबई । मुश्ताक अली टी-ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेच्या गटवार साखळीमध्ये (‘ड’ गट) शनिवारी मुंबईने घरच्या मैदानावर हरयाणावर 8 विकेट आणि 26 चेंडू राखून मात केली. माजी विजेत्यांचा हा सलग दुसरा विजय आहे.

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात यजमानांनी 154 धावांचे विजयी लक्ष्य 15.4 षटकांत 2 विकेटच्या बदल्यात पार केले. त्यात तिस-या क्रमांकावरील, कर्णधार सूर्यकुमार यादवचे मोठे योगदान आहे. त्याने अवघ्या 38 चेंडूंमध्ये 81 धावांची झंझावाती खेळी करताना मुंबईचा विजय सुकर केला. यादवच्या ’कॅप्टन्स इनिंग’मध्ये 11 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे. सलामीवीर आदित्य तरेने (28 चेंडूंत 39 धावा) छोटेखानी; परंतु महत्त्वपूर्ण खेळी केली.

तत्पूर्वी, हरयाणाला 20 षटकांत 5 बाद 153 धावांमध्ये रोखण्यात मुंबईच्या गोलंदाजांना यश आले. त्यांच्या चार फलंदाजांनी 25हून अधिक धावा केल्या तरी सर्वाधिक योगदान सलामीवीर हर्षल पटेलचे (33 धावा) आहे. मुंबईतर्फे मध्यमगती गोलंदाज तुषार देशपांडे (27-2) सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.मुंबईचा हा सलग दुसरा विजय आहे. दोन सामन्यांतून आठ गुणांसह त्यांनी ‘ड’ गटात अव्वल स्थान कायम राखले आहे. हरयाणाला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात प्रथमच पराभव पाहावा लागला आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN