मुंबईची केरळवर 8 गडय़ांनी मात

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-15 05:19:00

img

विजय हजारे करंडक : यशस्वी जयस्वालचे शानदार शतक

वृत्तसंस्था/ बेंगळूर

यशस्वी जयस्वाल (122) व आदित्य तरे (67) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर मुंबईने विजय हजारे चषक स्पर्धेत केरळवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह मुंबईला 4 गुण मिळाले आहेत. प्रारंभी, केरळचा डाव 199 धावांवर संपुष्टात आला. यानंतर मुंबईने विजयी लक्ष्य 38 षटकांत 2 गडय़ांच्या मोबदल्यात पूर्ण केले.

नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱया केरळची 3 बाद 57 अशी खराब सुरुवात झाली. कर्णधार रॉबिन उथप्पाने सर्वाधिक 43 धावा फटकावल्या. निदेश (40), चंद्रन (29) व राहुल पुनम (25) यांच्या शानदार खेळीमुळे केरळला 48.4 षटकांत 199 धावांचा टप्पा गाठता आला. इतर फलंदाजांनी मात्र सपशेल निराशा केल्यामुळे केरळला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. मागील सामन्यात द्विशतकी खेळी साकारणारा संजू सॅमसनलाही केवळ 15 धावा करता आल्या. मुंबईकडून शार्दुल ठाकुर व धवल कुलकर्णी यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.

यशस्वी जयस्वाल (132 चेंडूत 14 चौकार व 3 षटकरासह 122) व आदित्य तरे (88 चेंडूत 5 चौकार व 1 षटकारासह 67) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर मुंबईने विजयी लक्ष्य 38.2 षटकांत 2 गडयांच्या मोबदल्यात पार केले. जयस्वाल व तरे जोडीने 195 धावांची भागीदारी करत संघाच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावली. ही जोडी बाद झाल्यानंतर सिद्धेश लाड (नाबाद 2) व श्रेयस अय्यर (नाबाद 2) धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक : केरळ 48.4 षटकांत सर्वबाद 199 (उथप्पा 43, निदेश 40, राहुल 25, धवल कुलकर्णी 3/54, शार्दुल ठाकुर 3/40).

मुंबई 38.2 षटकांत 2 बाद 202 (यशस्वी जयस्वाल 132 चेंडूत 122, आदित्य तरे 88 चेंडूत 67, विष्णू विनोद 2/16).

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN